< शिक्षक भरती 2024 साठी अर्ज कसा करावा - यशस्वी होण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शक
Image source canva.com

शिक्षक भरती2024 :२१ हजार ६७८ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध

राज्यातील पात्रताधारकांचे लक्ष: हजारो पात्रताधारकांचे लक्ष लागलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेच्या जाहिराती पवित्र पोर्टल संकेतस्थळावर प्रसिद्ध

पदांची संख्या: एकूण २१ हजार ६७८ पदांसाठी हि भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे

पदांचा सारांश: सर्वाधिक पदे जिल्हा परिषद शाळांतील असून, खासगी अनुदानित, महापालिका, नगरपालिका, नगर परिषद शाळांचा समावेश आहे

जाहिरातीची प्रक्रिया: पवित्र संकेतस्थळावर जाहिरातीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ३४ जिल्हा परिषदांतील १२ हजार ५२२ पदे, १८ महापालिकांतील २ हजार ९५१ पदे, नगरपालिकांतील ४७७, नगरपरिषदांतील १ हजार १२३, खासगी अनुदानित ५ हजार ७२८ जागांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे

मुलाखती: मुलाखतीशिवाय १६ हजार ७९९ जागांवर, तर मुलाखतीसह ४ हजार ८७९ जागांवर भरती केली जाणार आहे

पसंतीक्रम नमूद: उमेदवारांना पसंतीक्रम नमूद करण्याची सुविधा ८ फेब्रुवारीपासून उपलब्ध करून दिली जाणार आहे. उमेदवारांनी पदनिहाय पसंतीक्रम नमूद करून ९ फेब्रुवारीपर्यंत निश्चित करणे आवश्यक आहे

गुणवत्ता यादी: पदभरतीसाठी उमेदवारांची प्राधान्यक्रमाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे

वेळापत्रक: त्याबाबतचे वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध केले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले

By NITIN.D

  Health Article WriterExploring news, job insights, health info, and more. Crafting engaging articles to empower and inform. Join the journey toward a healthier, informed lifestyle.