< Marathi Ukhane निवडा: प्रेम,शुभेच्छा आणि हास्याची खासदार संधी

Marathi Ukhane म्हणजे महाराष्ट्रातील लग्न सोहळ्यांत वापरले जाणारे पायरीचे वाक्य. त्यांमध्ये आपल्या देवांना विनंती, आशीर्वाद, प्रेम, आणि खुशीच्या भावना व्यक्त केली जातात. या उखाण्यांमध्ये छान अर्थ, शुभेच्छा, व खुप हास्य असतो. त्या लोकप्रिय आहेत जे लग्न समारंभांत, सामाजिक दावातांत वापरले जातात.

नवरींसाठी आणि नवरदेवासाठी उखाणे

marathi ukhane for female(नवरी साठी उखाणे)marathi ukhane for Male नवरदेवासाठी उखाणे
मंदिरात वाहाते, फुल आणि पान, … रावांचे नांव घेते, ठेऊन सर्वांचा मान.वसंतातली डाळ पन्ह, देती थंडावा …रावांसह मला आपला आशीर्वाद हवा.
छन छन बांगड्या, छुम छुम पैंजन, … रावांचे नांव घेते, ऐका सारे जण.कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास, मी भरवितो …… ला जलेबी चा घास.
गोकुळा सारखं सासर, सारे कसे हौशा, .. रावांचे नांव घेते, तिळ संक्रांती च्या दिवसी.भाजीत भाजी मेथीची, ……माझ्या प्रितीची
माहेर तसं सासर, नाते संबंधही जुने, .. रावं आहेत सोबत, मग मला कशाचे उणे.पुरणपोळीत तुप असावे साजुक, ……. आहेत आमच्या फार नाजुक
कपाळाचं कुंकु, जसा चांदण्यांचा ठसा, … रावांचे नांव घेते, सारे जण बसा.लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत राहते एकनिष्ठ प्रेम, …ची माझ्या हृदयात कोरली गेली एकमेव फ्रेम
रातराणीचा सुगंध, त्यात मंद वारा, … रावांचे नांवाचा, भरला हिरवा चुडासितेसारखे चरित्र, लक्ष्मी सारखं रूप,….मला मिळाली आहे अनुरूप
खडी साखरेची गोडी अन् फुलांचा सुगंध, … रावांच्या संसारात, स्वर्गाचा आनंद.गाडीत गाडी डेक्कन क्वीन, ……. आहे माझी ब्युटी क्वीन
पंच पक्वांनाच्या ताटात, वाढले लाडू पेडे, … रावांचे नांव घेतांना, कशाला आढे वेढे.संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका, ……चे नाव घेतो सर्वजण ऐका.
मंदिराचे वैभव, परमेश्वराची मुर्ती, … रावांचे नांव घेऊन करने इच्छापूर्ती.नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, ……..झाली आज माझी गृहमंत्री.
सनई आणि चौघडा, वाजे सप्त सुरात, … रावांचे नांव घेते, …च्या घरात.दुर्वाची जुडी वाहतो गणपतीला, सौ……सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला.
मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा, … रावांच नाव घेते निट लक्ष ठेवा.मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा, …….चे नाव घेतो नीट लक्ष ठेवा
संसार रुपी वेलीचा, गगनात गेला झुला, … रावांचे नांव घेते, आशीर्वाद द्यावा मलामोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट, …….चे बरोबर बांधली जीवन गाठ.
पतीव्रतेचे व्रत घेऊन, नम्रतेने वागते, … रावांचे नांव घेतांना, आशीर्वाद मागते.जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, …….च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने
लावित होते कुंकु, त्यात पडला मोती, …रावां सारखे मिळाले पती, भाग्य मानू कितीपंचपक्वनाच्या ताटात वाढले जलेबी,पेढे, ……चे नाव घ्यायला कशाला आढे वेढे
ताजमहाल बांधायला; कारागीर होते कुशल, … रावांचे नांव घेते, तुमच्या साठी स्पेशल.ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल, ………चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल
शंकराची पुजा पार्वती करते खाली वाकुन, … रावांचे नांव घेते, सर्वांचा मान राखुनअजिंठा वेरूळची शिल्पे आहेत सुंदर, ………..माझी सर्वांपेक्षा सुंदर.
श्री विष्णुचा मस्तकावर सदैव असतो शेष, … रावांचे नांव घेऊन करते गृह प्रवेश.एक होती चिऊ, एक होता काऊ, ……..चे नाव घेतो डोक नका खाऊ
यमुना जलावर पडली ताजमहालाची सावली, … रावांची जन्मदाती, धन्य ती माऊली.सनई चौघडा वाजतो सप्तसुरात, …………. चे नाव घेतो……..च्या घरात
अभिमान नाही संपत्तीचा, सर्व नाही रुपाचा, … रावाना घास घालते वरण-भात-तुपाचानिळे पाणी, निळे आकाश, हिरवे हिरवे रान, …..चे नाव घेतो ठेऊन सर्वांचा मान
लोकमान्य टिळक स्वराज्याचा हिरा, … रावांचे नांव घेऊन उरवाना करते पुरा.चांदीच्या ताटात रुपया वाजतो खणखण, ………चे नाव घेऊन सोडतो कंकण.
आकाशी चमकते तारे, जमिनीवर चमकते हिरे, … राव हेच माझे अलंकार खरेरुक्मीणीने केला पण कृष्णाला वरीन, … च्या साथीने आदर्श संसार करीन.
पजेच्या साहीत्यात, उदबत्तीचा पुडा, … रावांच्या नावाने, भरला सौभाग्याचा चुडा.जगाला सुवास देत उमलली कळी, भाग्याने लाभली मला… प्रेमपुतळी.
जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, … रावांचे नांव घेते, पत्नी या नात्यानेहत्तीच्या अंबारीला मखमली झुल, माझी … नाजुक जसे गुलाबाचे फुल.
वय झाले लग्नाचे, लागली प्रेमाची चाहूल, … रावांचे जीवनात टाकले मी पाऊल.सर्व फुलांचा राजा गुलाबाचे फुल, संसार करु सुखाचा … तु, मी आणि एक मुल
जेव्हा मी ह्यांना पाहते चोरुन विचार करते मुक होऊन, घडविले देवानी… रावांना जीव लावूनलग्नाचा वाढदिवस करु साजरा, … तुला आणला मोग-याचा गजरा.
धरला यांनी हात, वाटली मला भिती, हळूच म्हणाले… राव अशीच असते प्रिती.कोरा कागज काळी शाई, … ला रोज देवळात जाण्याची घाई.
नव्हती कधी गाठ मेट, एकदाचं झाली नजरा नजर, आई-वडी विसरले…रावांसाठी सुटला प्रितीचा पाझर.संसार रुपी सागरात पती पत्नीची नौका, …चे नाव घेतो सर्व जण ऐका.
राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न दशरथाला पुत्र चार, … रावनी घातला मला मंगळ सुत्राचा हारदारी होते कोनाडे त्यात होती पळी, माझी … व्यवहाराच्या बाबतीत अगदीच खुळी.
पोर्णिमेचा चंद्र आकाशात दिसतो साजरा, … रावांनी आणला मला मोग-याचा गजरा.आंबागोड, उस गोड, त्याही पेक्षा अमृत गोड, … चंनाव आहे अमृतापेक्षा ही गोड.
दारी होता टेबल, त्यावर होता फोन, … रावांनी पिक्चर दाखवला हम आपके हैं। कौन?श्रावण मारती भुदेवीने पांघरली हिरवी शाल, … गेली माहेरी की होतात माझे हाल.
अंगणी होती तुळस, तुळशीला घालत होती पाणी, आधी होती आई बाबाची तान्ही, आता आहे..रावांची राणी.माझे पिता … माझी माता, शुभमुहूर्तावर घरी आणली … ही कान्ता.
गुलाबाचे फुल दिसायला ताजे, … रावांचे नांव घेते, सौभाग्य माझे.जाई जुई च्या फुलांचा दरवळला सुगंध, … च्या सहवासात झालो मी धुंद.
डाळिंबाचे झाड, पानोपानी दाटले, … रावांचे नांव घेतांना, आनंदी मला वाटले.उभा होतो मळ्यात, नजर गेली खळ्यात, नवनांचा हार … च्या गळ्यात.
डाळिंब ठेवले फोडून, संत्र्याची काढली साल, .. रावांच्या नावाने कुंकु लावते लाल.सीतेसारखे चारीत्र्य, रंभेसारखे रुप, … मिळाली आहे मला अनुरुप.
हिमालय पर्वतावर, बर्फाच्या राशी. … रावांचे नांव घेते… च्या दिवशीसायंकाळच्या आकाशाचा पिवळसर रंग, … माझी नेहमी घरकामात दंग.
शरदाचे संपले अस्तीत्व, वसंताची लागली चाहूल, …रावांच्या संसारात टाकते पहीले पाऊल.सायंकाळच्या आकाशाचा पिवळसर रंग, … माझी नेहमी घरकामात दंग.
गृह कामाचे शिक्षण देते माता, …रावांचे नांव घेते तुमच्या आग्रहाकरीताराधिकेला कृष्ण म्हणे हास राधे हास, मी देतो… ला लाडवाचा / करंजीचा घास.
पषातील धुंद वारा छेडीतो, माझ्या अंगाला, … रावांचे नांव घेते सुर्यनारायनाच्या साझीलाराधिकेला कृष्ण म्हणे हास राधे हास, मी देतो… ला लाडवाचा / करंजीचा घास.
चंदेरी सागरात, रुपेरी लाटा, … रांवाच्या सुखदुःखात अर्धा माझा वाटा.जीवनात लाभला मनासारखा साथी, माझ्या संसार रथावर … सारथी.
स्वातंत्र्याच्या होमकुंडात विरांनी घेतली उडी, …रावाच्या नावाने घालते गळ्यात मंगळ सुत्राची जोडीचंद्रला पाहून भरती येते सागराला, … ची जोड मिळाली माझ्या जीवनाला.
रावांच्या नावाने, भरला हिरवा चुडा, त्यांच्यावर करेल मी प्रेमाचा सडानिळे पाणी, निळे डोंगर, हिरवे हिरवे रान, … चे नावघेऊन राखतो सर्वाचा मान.
केसात माळते रोज, मी गुलाबाचे फुल, … राव माफ करतात माझी प्रत्येक भुल.संसाराच्या सागरात पती पत्नी नावाडी, … मुळे लागली मला संसाराची गोडी.
आज सारे सुख माझ्या दारी दाटले, …रावांचा प्रेम अजुन तरी नाही आटले.रुप्याचे ताट त्यावर सोन्याचे ठसे, … ला पाहून चंद्र-सुर्य हसे.
शिक्षणाने विकसीत होते, संस्कारीत जीवन, …रावांच्या संसारात राखीन मी सर्वांचे मन.पाण्याने भरला कलश त्यावर आंब्याची पाने फुले, … चं नाव घेतल्या वर चेहरा माझा खुले.
प्रेमाचे कच्चे धागे खेचती मागे पुढे, …रावांच्या साथी साठी माहेर सोडावे लागे.मातीच्या चुली घालतात घरोघर, … झालीस माझी आता चल बरोबर.
चंद्राचा झाला उद्य अन् समुद्राला आली भरती, …रावांच्या प्रेमाने सर्व दुःख हरती.शंकरा सारखा पिता अन् पार्वती सारखी माता, … राणी मिळाली स्वर्ग आला होता.
नील नभाच्या तबकात नक्षत्रांचा हार, … रावांचा स्वभाव आहे फारच उदारस्वतंत्र भारताची तिरंगी ध्वजाणे वाढविली शान, …चे नाव घेतो ठेऊन सर्वाचा मान
वसंतातली डाळ पन्ह, देती थंडावा …रावांसह मला आपला आशीर्वाद हवा.अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रुपाचा, …. ला घास घालतो वरण-भात-तुपाचा.
दोन जीवांचे मिलन जणू शत-जन्माच्या गाठी, …चे नाव घेते तुमच्या साठी!नंदनवनीच्या कोकिळा बोलती गोड, … राणी माझा तळहाताचा फोड.

गृह प्रवेश उखाणे आणि नवीन उखाणे

Bride’s entering the new house (Image: StudioRed
Bride’s entering the new house (Image: StudioRed)
गृह प्रवेश नवीन उखाणे
जमले आहेत सगळे, ….. च्या दारात… ….. रावांचे नाव घेते, येऊ द्या ना घरात.पुरुष म्हणजे सागर, स्त्री म्हणजे सरिता, …….. रावांचे नाव घेते, तुम्हा सर्वां कारिता
सासरे आहेत प्रेमळ, सासुबाई आहेत हौशी, …… चे नाव घेते प्रवेश करण्याच्या दिवशी.फुल फुलावे रानोरानी स्वप्न गहिरे दिसावे …….. रावांच्या सुखात माझे सुख असावे.
रुपेरी सागरावर चंदेरी लाट, ……….रावानच नाव घेते सोडा माझी वाटसह्याद्री पर्वतावर होते शिवरायांचे दर्शन …….. रावांच्या प्रेमासाठी अखंड जीवन अर्पण
हंड्यावर हंडे सात त्यावर ठेवली परात ……….- बसले दारात मी जाऊ कशी घरातनात्यांच्या मंदिराला सोन्याचा कळस, …….. राव आमचे आहेत सर्वांपेक्षा सरस.
लग्न झाले आता,आमची बहरू दे संसारवेल… ….. च नाव घेते, वाजवून __च्या घराची बेलआकाश्यात उड़णाऱ्या राजहंसाचे काळे नीळे डोळे …….. रावांचे मन माझ्या हृदयात फिरे
जरतारी पैठणीवर शोभे, कोल्हापुरी साज… ….. च नाव घेऊन, गृहप्रवेश करते आजआकाशाच्या अंगणात सूर्य चंद्राचा दिवा …….. रावांचा सहवास मला जन्मोजन्मी हवा
पौर्णिमेचा दिवस चंद्राला लागते चाहूल, …रावांच्या जीवनात टाकते मी पहिले पाऊल.कर्ण ऋषींच्या आश्रमात शकुंतलेचे माहेर, …….. रावांनी दिले मला सौभाग्याचे आहेर.
नदीच्या काठावर कृष्ण वाजवितो बासरी, …रावां सोबत आली मी सासरीचांदीच्या निरंजनात प्रेमाची फुलवात, …….. रावांचे नाव घेते, पावसाची झाली सुरवात.
सनई आणि चौघडा, वाजे सप्त सुरात, … रावांचे नांव घेते, …च्या घरात.दही, दूध, तूप आणि लोणी… …….. रावांचे नाव घेते मी त्यांची राणी
माहेरी साठवले, मायेचे मोती… ….. च नाव घेऊन, जोडते नवी नातीसोन्याच्या ताटात खडीसाखरेची वाटी, …….. रावांचा नाव घेते सात जन्मासाठी
नाचत नाचत वाजत-गाजत, आली आमची वरात… ….. रावांचे नाव घेते, …..च्या दारातआभाळ भरले चांदण्यांनी, चंद्र मात्र एक …….. रावांचे नाव घेते …….. ची लेक
नवे नवे जोडपे, आशीर्वादासाठी वाकले… ….. रावांसोबत, मी सासरी पाऊल टाकलेबसली होती दारात, नजर गेली आकाशात …….. …….. रावांचा फोटो माझ्या भारताच्या नकाशात
हंसराज पंक्षी दिसतात हौशी, ……….रावाचे नाव घेते सत्यनारायनाच्या दिवशीरिम झिम झरती श्रावण धारा धरतीच्या कलशात …….. रावांचे नाव घेते राहू द्या लक्षात.
हिरव्या शालुला जरिचे काठ …..चे नाव घेते, सोडा माझी वाटप्रसंगानुरूप येते परमेश्वराची आठवण …….. रावांच्या हृदयात अमृताची साठवण
गुलाबाच्या झाडाला कळ्या येतात दाट ….. नाव घेते सोडा माझी वाटमंगल दिनी मंगल कार्याला आंब्याच्या पानांचा बांधतात तोरण …….. रावांचे नाव घायला …….. च कारण
गुलाबाच्या झाडाला कळ्या येतात दाट ………. नाव घेते सोडा माझी वाटतांब्याच्या पळीवर नागाची खून, …….. रावांचा नाव घेते…….. ची सून.
गुलाबाच्या झाडाला कळ्या येतात दाट ………. नाव घेते सोडा माझी वाटनीलवरणी आकाशात शोभते चंद्राची कोर …….. राव सारखे पती मिळाला भाग्य लागतं थोर.
चिवड्यात घालतात खोबऱ्याचे काप ………. रावां समवेत ओलांडते मापबकुळीची फुले सुकली तरी हरवत नाही गंध …….. …….. रावासाठी माहेर सोडले तरी राहतील मनात स्म्रुतिबंध
माझ्या धान्याचे माप आज शिगोशीग भरले, म्हणून …….. रावांची मी सौभाग्यवाती झालेतिरंगी झेंड्यावर अशोकचक्राची खूण, …….. नाव घेते …….. ची सून
आई बापाने वाढवले मैत्रिणीने घडवले ………. चं नाव घ्यायला ………. अडवलेबागेत फूल गुलाबाचे माझ्या मनात नाव …….. रावांचे .
उंबरठयावरचं माप पायांनी लोटते ………. रावांच्या घरात भाग्याने प्रवेश करतेएक दिवस अचानक आला एक घोडेस्वार श्वेत रंगी घोड्यावर …….. रावच होते ते जादूगार
आकाशाच्या प्रांगणात ब्रम्हा विष्णू आणि महेश, …रावांच नाव घेते आणि करते मी गृहप्रवेश.सुंदर माझे घर त्यात …….. रावांचा मधुर स्वर दोघे मिळून फुलवतोय संसाराचा भरभरुन बहर.
वय झाले लग्नाचे, लागली प्रेमाची चाहूल, … रावांच्या जीवनात टाकले मी पाऊल.खाण तशी माती …….. राव माझे पती आणि मी त्यांची सौभाग्यवती
शरदाचे संपले अस्तित्व, वसंताची लागली चाहूल, …रावांच्या संसारात टाकते पहिले पाऊलजीवनाच्या सागरात पती पत्नी ची नौका …….. रावांच नाव घेते सर्वांनी लक्ष देऊन ऐका

By NITIN.D

  Health Article WriterExploring news, job insights, health info, and more. Crafting engaging articles to empower and inform. Join the journey toward a healthier, informed lifestyle.

4 thoughts on “Marathi ukhane male and female लग्न सोहळ्यांसाठी निवडा: प्रेम, शुभेच्छा आणि हास्याची खासदार संधी!””
  1. […] आपल्या वयोमानानुसार आपण अर्धश्वसनात, कप पर्यंत प्रोटीन आवश्यकता असते. प्रोटीन तुमच्या घटपटाच्या घटकांवर प्रतिक्रियाशील असतो आणि खडेपणासाठी सुगंधित असतो. तुम्ही ब्रोकोली, मटर, टोमॅटो, पालक, लौकी, आह्या आणि अन्य सब्ज्या खायला निवड करू शकता. […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *